मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो. तलाठी - मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार - तहसीलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी- अशी पदांची चढती रचना आहे.