भुवनदेवकृत अपराजितपृच्छा (बारावे–तेरावे शतक) या ग्रंथात तलावांचे सहा प्रकार मानले आहेत; ते असे : (१) अर्धचंद्राकृती 'सर', (२) गोलाकार 'महासर', (३) चौकोनी 'भद्रक', (४) भद्रक एकमेकांना जोडून बनलेले ते 'सुभद्र', (५) ज्या तलावांत बगळे उतरतात ते 'परिघ' व (६) दोन परिघ एकमेकांना जोडलेले ते 'युग्मपरिघ'.