गाळांचे थर एकावर एक असे पडत जाऊन व साचत जाऊन हे खडक तयार होत असल्यामुळे ते अनेक थरांचे बनलेले असतात. अशी स्तरांकित रचना किंवा स्तरण हा गाळाच्या खडकांचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. भूकवचाच्या तीन प्रकारच्या खडकांपैकी गाळाचे खडक हा एक प्रकार असून अग्निज खडक व रूपांतरित खडक हे इतर दोन प्रकार होत.