तिबेटचा इतिहास सतत युद्ध आणि बदलता राहिला आहे. तिबेट कधी सार्वभौम राहिला आहे तर कधी त्यावर चीन आणि मंगोलियन राजवंशांची सत्ता राहिली आहे. मात्र 1950 साली चीनने आपला पूर्ण ताबा तिबेटवर यावा यासाठी हजारो सैनिक तिथं पाठवले. तिबेटच्या काही भागांना स्वायत्त प्रदेश बनवले आणि बाकी प्रदेशांना इतर चिनी प्रदेशांना जोडून टाकले.