अटलांटिक महासागर: विस्ताराने जगातील दुसऱ्‍या क्रमांकाचा महासागर. क्षेत्रफळ ८,१६,६२,३२५ चौ. किमी. आफ्रिकेमधील ॲटलास पर्वतावरून प्राचीन रोमन लोकांनी या महासागरास 'अटलांटिक'हे नाव दिले असावे, असे काही लोकांचे मत आहे.