तेलंगणा विधानसभा (तेलुगू: తెలoగాణ రాష్ట్ర శాసన సభ) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: तेलंगणा विधान परिषद). ११९ आमदारसंख्या असलेल्या तेलंगणा विधानसभेचे कामकाज हैदराबादमधून चालते. तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे मधूसुदन चारी विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे विधानसभेचे नेते आहेत.