परंतु येथे कॅक्टसचे अनेक प्रकार आढळतात. यांशिवाय कपोक, कॅनन बॉल, क्रॅबवुड, पनामाहॅट ताड, कारनाउबा ताड (वंगण व पॉलीश यांस उपयुक्त), बालसा (अत्यंत हलके लाकूड), ॲव्होकॅडो (आंब्यासारखे लोकप्रिय फळ), सिंकोना, माटे, क्वेब्राचो (कठीण लाकूड, टॅनीन), या दक्षिण अमेरिकेतील काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहेत.