अंटार्क्टिका : दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्रफळ १,३३,७७,००० चौ. किमी. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे.