दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे. मेघालय पठार आणि त्याच्याशी संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे.