देशात वित्तीय धोरण कोण ठरवते?

देशात वित्तीय धोरण अर्थ मंत्रालय ठरवते. भारतात, वित्तीय धोरण वित्त मंत्रालयाने आपल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांद्वारे तयार केले आहे.

वित्तीय धोरण :

एखाद्या देशाच्या आर्थिक व सामाजिक उदिष्टे लक्षात घेवून त्याच्या पूर्ततेसाठी केलेला खर्च व तो खर्च भागवण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत यांचे केलेले नियोजन म्हणजे वित्तीय धोरण होय.


वित्तीय धोरणाची उदिष्टे :

1. अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे व विकासाचा दर कायम ठेवणे.

2. परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे.

3. रोजगार पातळी प्रस्तापित करून लोकांचे जीवनमान उंचावणे.

4. दारिद्य निर्मुलन ,साक्षरता ,पायाभूत क्षेत्राच्या सोई उपलब्ध करून देणे