द्रवरूप पदार्थां मधील रेणू एकमेकांपासून थोडे दूर असल्यामुळे आंतररेण्वीय बल मध्यम प्रकारचे असते. त्यामुळे द्रव पदार्थांना विशिष्ट आकार नसतो मात्र विशिष्ट आकारमान असते आणि ते प्रवाही (Flowing) असतात. म्हणून पावसाचे पाणी वाहून जाते किंवा दूध उतू जाते. संजू, द्रवपदार्थ हे कमी‌‌- जास्त प्रवाही असतात.