याचाच अर्थ असा की, द्रविडांचे मूलस्थान कोणतेही असो, भारतात तरी हे लोक आर्यपूर्व आहेत असे म्हणावे लागते. ह्यांचा आर्य धर्माशी आणि संस्कृतीशी मनोहर मिलाफ झाला. हे द्रविड लोकसुद्धा अत्यंत पुढारलेले होते. शैव पंथ आणि योगमार्ग हे सिंधू संस्कृतीचे, म्हणजेच पर्यायाने द्रविड संस्कृतीचे, वैशिष्ट्य होय.