वास्तववाद ही आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधीची एक विचारधारा आहे, ज्याची सुरुवात अधुनिक युरोपाच्या सुरुवातीच्या काळातील रियल पॉलिटीक राज्यकारभारापासून झाली़. जरी त्यामधे अनेक विचारांचा समावेश होत असला तरी जागतिक राजकारण म्हणजे अंतिमतः सत्ता मिळविण्यासाठी विविध कृतिशील घटकांचा आपापसातील संघर्ष आहे, अशी त्यांची मध्यवर्ती संकल्पना आहे. वास्तववादात मुख्यत्वे तीन विचारधारा आहेत. पारंपारिक वास्तववाद मानवी स्वभावाला केंद्रस्थानी ठेवतो. नववास्तववाद राज्यव्यवस्थेच्या अराजकी रचनेवर भर देतो. नवपारंपारिक वास्तववाद वरील दोहोंच्या एकत्रीकरणावर आधारित आहे. या शिवाय वास्तववादाचे काही स्थानिक प्रकार पण आहेत. राज्यांनी जागतिक राजकारणाला दिशा कोणत्या प्रकारे द्यावी यावरून वास्तववादाचे संरक्षक वास्तववाद[१][१] आणि आक्रमक वास्तववाद असे दोन तट पडतात (बहुतांश वास्तववादी या दोन्ही गटात बसत नाहीत). वास्तववाद्यांचा असा दावा आहे की त्यांच्या विचारधारेतील परंपरांना प्राचीन इतिहासआहे, ज्यात थुसिडिडस, थॉमस हॉब्ज, कौटिल्य आणि निकोलो मॅकीयावेली यांचा समावेश होतो.
नवीन विषयवस्तूंच्या निवडीमुळे ते साकार करण्यासाठी नवीन तंत्राचा वापर अनिवार्य असतो. वास्तववादी तंत्राचा वस्तुनिष्ठता हा पाया असतो. वास्तव आहे तसे मांडण्यासाठी शास्त्रज्ञाचा दृष्टिकोण आत्मसात करण्याची लेखकाची महत्त्वाकांक्षा असते. केवल वस्तुनिष्ठता अशक्य असली, तरी या तत्त्वामुळे निव्वळ कल्पनारम्यतेतून निर्माण होणारा वस्तुस्थितिविक्षेप टाळता येतो व लेखक वास्तवाच्या खंबीर पायावर उभा राहू शकतो. व्यक्तिचित्रण, कथानक (प्लॉट) आणि तंत्ररचना यांतील कृत्रिमता टाळता येते. यामुळे जीवनाचा कुठलाही तुकडा परिपूर्णतेने साहित्यात अवतरू शकतो. पारंपारिक नायक हा एकमेवाद्वितीय असतो, म्हणून ते व्यक्तीचे कृतक रूप असते. वास्तववादातील चित्रणविषय व्यक्तीचे ‘सामान्यत्व’ हेच व्यवच्छेदक लक्षण असते. पारंपरिक नायकाची हकालपट्टी होऊन सामान्यत्वाच्या गुणामुळे बऱ्याचदा समूह हेच त्याची जागा घेतात. वास्तववादी लेखकाच्या तात्त्विक भूमिकेनुसार वास्तव वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिरपेक्ष असते. ते कार्यकारणभावाच्या नियमबद्ध साखळीत विणलेले असते. मानव हा त्या साखळीतील केवळ एक दुवा असल्याने त्यालाही कार्यकारणाचे नियम लागू होत असतात. मानवी जीवनव्यवहार हे त्याच्या भौतिकतेच्या परिघातच अर्थपूर्ण असतात. मानव हा प्राणी आहे आणि तो सामाजिक आहे. प्राणिजीवनाच्या व सामाजिक जीवनाच्या नियमांनीच त्याचे अस्तित्व निर्धारित झालेले असते.
नव वास्तववादाचा जनक कोण आहे?
✅ Updated recently