ओसायरिस हा मूळचा नाईल नदीचा दुष्टदेव क्रमाने पाणी, समुद्र व पृथ्वी यांचा देव बनला. हापी हा नाईल नदीचा आणि मिन हा निसर्गाच्या जननक्षमतेचा देवही तेथे पूज्य होता. ग्रीक लोकांत सूर्य (हीलिऑस), चंद्र (सीलीनी) आणि पृथ्वी (जीवाजीआ) यांची पूजा चाले. टाइटन येथे वायूंना बळी अर्पण करण्यासाठी वेदी उभारलेली होती.