पंचायत समितींची रचना

महाराष्ट्रात एकूण ३३ जिल्हा परिषदा व ३४९ (सन २००४ अखेर) पंचायत समित्या आहेत. पंचायत समितीचे सदस्य विधानसभा मतदार संघाच्या यादीतील १८ वर्षावरील स्त्री पुरूष यांच्या मतदानाने निवडून येतात. पंचायत राज्य संस्थेत जिल्हा परिषद ही उच्च स्तरावरील संस्था असून पंचायत समिती तिची उपसमिती आहे.