नाटक हा एक वाङ्मय प्रकार आहे. पण हा केवळ वाचनासाठी निर्माण झालेला नाही. हा दृक्-श्राव्य स्वरूपाचा वाङ्मय प्रकार आहे. नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता(script) आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक.