नियंत्रण हे गतिमान स्वरूपाचे कार्य असून त्याची जबाबदारी संघटनेतील सर्व स्तरांवर प्रमुख किंवा पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची असते. नियंत्रणक्षेत्र जितके लहान असेल, तितके व्यवसायातील कार्य व नियंत्रण अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमतेने होते.