मोठ्या गटातून प्रातिनिधिक स्वरूपाचा लहान गट निवडणे म्हणजे नमुना निवड होय. उदा., भात शिजला आहे की, नाही हे बघण्यासाठी काही भाताची शिते आपण दाबून बघतो, म्हणजेच नमुना निवडतो आणि त्याच्या चाचणीवरून अनुमान काढतो.