पंचायत समिती मेंबर १२ ते १५ गावांचे प्रतिनिधीत्व करत असतो. या सदस्याची दरमहा ७५० रुपये मानधनावर बोळवण केली जाते. ग्रामीण भागातील समस्या व अडचणींची पाहणी करण्यासाठी गावोगावी जावे लागणाऱ्या लोकप्रतिनिधीला एवढे अल्प मानधन दिले जाते.

धक्कादायक म्हणजे गावाचा कारभार सांभाळणाऱ्या सरपंच व सदस्यांना मात्र बिनपगारीच काम करावे लागते. मानधनापोटी एकीकडे हजारो रुपये दिले जात असताना झेडपी, पंचायत समिती सदस्यांना अत्यल्प तर ग्रामपंचायत सदस्यांना बिनपगारी काम करावे लागत आहे.