अफझलखान व रुस्तम-इ-जमान यांच्या पराभवामुळे वीजपुर आदिलशहाने सिद्धी जोहर यास शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी २०,००० घोडदळ व ४०,००० पायदळ व तोफखाना देवून रवाना केले. आदिलशहाने सिद्धी जोहरला ' सलाबतखान ' असा किताब देखील दिला. शिवाजी महाराज मिरजेच्या किल्यास वेढा घालून होते .