परिसंस्था सेवा म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
परिसंस्थेकडून, आणि पर्यायाने जैवविविधतेकडून, जे जे फायदे अनेक स्वरुपात आपणाला मिळत असतात त्यांना परिसंस्था-सेवा म्हणतात. या सेवा मानवासहित सर्वच जीवांना वेगवेगळ्या प्रमाणात मिळत असतात. शेतीसाठी लागणारी कसदार माती, मुबलक पाणी, स्वच्छ हवा ह्या सर्व परिसंस्थेमुळे मिळणाऱ्या सेवा आहेत.