आता यात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोन्हीच्या पेशीत ही 23 गुणसूत्रे एकेकटी असतात जी दोन बीजांचे मिलन झाल्यावरच जोडीच्या स्वरूपात तयार होतात व अशारीतीने जनुकाचा संपूर्ण साठा तयार होतो. क्लोनिंग या तंत्राद्वारे जगात पहिला सस्तन प्राणी जन्माला आला त्याचे नाव डॉली. हिला फक्त माता होती पिता नव्हता.