पाकिस्तानच्या स्थापनेला 11 वर्षं पूर्ण झाल्यानंतर, 1958 मध्ये देशात पहिला मार्शल लॉ लागू करण्यात आला. कुदरतुल्लाह शहाब 'शहाबनामा' मध्ये लिहितात की, 'ऑक्टोबर 1958 मध्ये राज्यघटना बरखास्त करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. त्यावेळी पाकिस्तानला कोणताही परकीय शक्तींचा धोका नव्हता.