प्यायचे पाणी साठवायचा पिंप, कळशी वगैरे साधने आतून नियमितपणे स्वच्छ केली जावीत. स्नानासाठी वापरायच्या बादल्या आतून धुवून घेणे, घरातील पाण्याची टाकी व्यवस्थित साफ करणे, हेसुद्धा गरजेचे. या सर्व उपायांनी पाण्यातून संसर्ग होऊ नये यासाठी दक्ष राहता येते.