२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात पार पडलेल्या २०२२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत भारत सहभागी देश होता. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली.