पूर्व आफ्रिकेतील काही जमाती, भारतातील तोडा व खस, तसेच एस्किमो व तिबेटमधील काही जमाती यांत तुरळक प्रमाणात बहुपतित्व आढळते. बहुपतित्वाची नेमकी कारणे सांगता येत नाहीत; परंतु असल्या जमातींत मुलींना लहान वयात मारण्याची प्रथा आहे. तोडा जमातीत एक पती आपल्या गर्भवती पत्‍नीस लहान धनुष्यबाण देतो.