पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.
पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. पैकी महत्वाची दोन कारणे म्हणजे पृथ्वीभोवती असलेले वातावरण (ज्यामुळे सूर्याची हानिकारक किरणे परावर्तित केली जातात) आणि पृथ्वीवर असलेले पाणी (ज्याशिवाय आपल्याला माहिती असलेली जीवसृष्टी अशक्य आहे). आपण ज्या हवेत श्वासोच्छवास घेतो त्या हवेत ७८% नायट्रोजन, २१% प्राणवायू (ऑक्सिजन) आणि १% उरलेले सर्व वायू आहेत. त्या तीन टक्क्यांमध्ये सुमारे ०.०४% कार्बनडायऑक्साईड आहे. पृथ्वीचा ७०% पृष्ठभाग पाण्याने तर उरलेला ३०% पृष्ठभाग जमिनीने व्यापलेला आहे. त्या ७०% पाण्यापैकी सुमारे ९७% पाणी हे महासागराच्या रुपात खाऱ्या पाण्याच्या रुपात आहे. उरलेले ३% पाणी गोडे पाणी आहे. मात्र त्यातील सुमारे ९०% गोडे पाणी हे दोन्ही धृवांवर आणि इतरत्र हिमनद्या आणि बर्फाच्या स्वरूपांत गोठलेले आहे. म्हणजेच पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी केवळ ०.३% पाणी हे वापरण्यायोग्य अशा द्रव स्वरूपांत उपलब्ध आहे.
पृथ्वी ही एक closed system आहे. सूर्याच्या प्रकाशाशिवाय पृथ्वीवर बाहेरून काही येत नाही आणि पृथ्वीच्या बाहेर काही जात नाही (उल्का, मानवनिर्मित याने वगैरे सन्माननीय अपवाद सोडून द्या!). अर्थात इथे उपलब्ध सर्व गोष्टी (सुर्याप्रकाशासकट) मर्यादित आहेत आणि एका मोठ्या जीवनचक्राचा भाग आहेत. सूर्यप्रकाशाच्या उर्जेचे रासायनिक उर्जेत रुपांतर करणारे जीव (झाडे/ समुद्रातील phytoplanktons) हे ह्या ग्रहावरील बहुतांश सर्व उर्जेचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष स्रोत आहेत. त्यांच्यावर जगणारे इतर सर्व जीव हे ह्या चक्राचा दुसरा अविभाज्य घटक आहेत. ह्या चक्राचा तिसरा अविभाज्य घटक म्हणजे elements (मूलद्रव्ये). ही ह्या जीवनचक्रात recycle होत राहतात. आपल्यापैकी काहींना कदाचित शाळेत शिकलेली water cycle, carbon cycle, nitrogen cycle इ. आठवत असतील. थोडक्यात उत्पत्ती-स्थिती-लय हे पृथ्वीवरील जीवनचक्राचे सूत्र आहे.
रिसंस्था (Ecosystem)/ अन्न साखळी (food chain-web-pyramid)
पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या काळात अनेक प्रजाती निर्माण झाल्या आहेत (बऱ्याच नष्टही झाल्या आहेत) ज्या एकमेकांवर अवलंबून आहेत. पृथ्वीच्या विविध भौगोलिक परिस्थितीअनुरूप अनेक परिसंस्था अस्तित्वात आहेत. अर्थात ह्या सर्व परिसंस्थांची मिळून जी सगळ्यात मोठी परिसंस्था अस्तित्वात आहे ती म्हणजे पृथ्वी! ह्या परीसंस्थेचे मजेशीर उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे माणूस! जर एकटे असताना स्वतःला आरशात निरखताना तुम्ही स्वतःला एकटा जीव सदाशिव समजत असाल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे Wink एका सुदृढ माणसाच्या शरीरात जेवढ्या पेशी असतात (37.2 trillion) त्याच्या दसपट विविध प्रकारचे सूक्ष्मजीव त्याच्या शरीरावर आणि शरीरात असतात. It is termed as human microbiota. ही एक mutual/commensal relationship आहे ज्याचे फायदे माणूस आणि सूक्ष्मजीव दोघांना मिळतात. एका परीसंस्थेमध्ये mutual/commensal, predatory, parasitic अशा अनेक नात्यांनी एकमेकांवर अवलंबून असलेले जीव असतात. ज्यातून अत्यंत गुंतागुंतीचे food web तयार होते. जीवो जीवस्य जीवनमं ह्या न्यायाने हेच जीव एकमेकांचे अन्न बनतात. उदा. गवताळ भागात असलेल्या एका परिसंस्थेत गवत खाऊन जगणारे शाकाहारी प्राणी पक्षी असतात, ज्यांच्यावर वाघ सिंह ह्यासारखे मांसाहारी प्राणी जगतात, मेलेल्या प्राण्यांना खाणारे गिधाडे, तरस ह्यांसारखे scavengers असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना (पाने/फळे/मृत प्राणी) decompose करणारे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव जैविक पदार्थांचे संपूर्णपणे विघटन करून त्यातील मूलद्रव्ये recycle करतात जी पुन्हा गवताच्या वाढीसाठी उपयोगी पडतात. अशाप्रकारे जीवनचक्र पूर्ण होतेच पण मूलद्रव्यांचे चक्रही पूर्ण होते. गवताने प्रकाशसंश्लेषणाच्याद्वारे (photosynthesis) fix केलेला कार्बन हा फूड वेबमध्ये फिरून, विघटन होऊन पुन्हा कार्बन डाय ऑक्साईड म्हणून वातावरणात परत येतो. अशा विविध परिसंस्था पृथ्वीच्या वेगवेगळ्या भूभागांत/पाण्यात (वाळवंट, गवताळ प्रदेश, वर्षावने, temparate regions, समुद्र, तलाव, नद्या, खाडी इ.) कार्यरत आहेत. ह्या परिसंस्था कशा चालतात ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला अजूनही नाहीए . मात्र ह्या परिसंस्था टिकण्यासाठी त्यातील सर्व जैविक (biotic – all species) आणि अजैविक (abiotic-climate, soil, temparature etc) घटक आवश्यक असतात. जेव्हा ह्यापैकी कोणत्याही घटकात बदल होतो वा कोणताही घटक नाहीसा होतो तेव्हा ती परिसंस्था हळूहळू कोलमडून पडते आणि नष्ट होते.
पृथ्वीचे पर्यावरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.