पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या एकूण सुमारे ८० लाख प्रजाती असाव्यात असा शास्त्रज्ञांचा अंदाज असून, त्यांपैकी सुमारे दहा लाख प्रजाती विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा 'ग्लोबल असेसमेंट रिपोर्ट ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्व्हिसेस' या अहवालाने दिला आहे.