पैशाचा पुरवठा वाढला, म्हणजे वस्तूंच्या किंमती वाढतात म्हणजेच पैशाची किंमत कमी होते. उलटपक्षी पैशाचा पुरवठा कमी झाला, की वस्तूंच्या किंमती कमी होतात आणि पर्यायाने पैशाची किंमत वाढते, असा हा सिद्धांत आहे. पूर्ण रोजगारीच्या गृहीत तत्त्वावर हा सिद्धांत आधारलेला आहे.