विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा सर्वग्राह्य असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होते. मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुसरे महत्त्वाचे कार्य होय. दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो.