ब्राझीलला येणारा पहिला युरोपियन पेड्रो अल्वारेस कॅब्राल होता. तो ब्राझीलला आप २२ एप्रिल, १५०० रोजी पोर्तुगालच्या प्रायोजनाखाली आला. त्या नंतर १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत ब्राझीलमध्ये पोर्तुगालची वस्ती होती. ७ सप्टेंबर, १८२२ला ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.