मुलांनी स्वतः होऊन आनंदानं शिकावं यासाठी आता शिक्षणात प्रकल्प पद्धती वापरली जाते. मुलांच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची असणारी भाषा व तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती करण्याची संधी देण्यासाठी प्रकल्प ही सर्वांत प्रभावी पद्धत आहे. मुलांना वेगवेगळ्या विषयांतर्गत प्रकल्प देता येतात. प्रकल्प ही एका अर्थी नवनिर्मिती असते.