भौतिकशास्त्रातील मूलभूत भूमिका निर्वात पोकळीतील प्रकाशाच्या गतीवर प्रकाशस्रोताच्या गतीचा तसेच निरीक्षकाच्या जडत्वीय संदर्भचौकटीचा परिणाम होत नाही. मॅक्स्वेलच्या विद्युच्चुंबकत्वाच्या सिद्धान्ताने प्रभावित होऊन आइन्स्टाईनने प्रकाशाच्या गतीचे स्थिर मूल्य १९०५ साली मांडले.