प्रतिक्रिया-काल म्हणजे उद्दीपकाची सुरुवात आणि त्या उद्दीपकास अनुसरून केलेल्या प्रतिक्रियेचा आरंभ यांमधील कालांतर. प्रयोगशाळेमध्ये प्रतिक्रिया-काल मोजण्यासाठी प्रतिक्रिया-काल-उपकरण आणि लघुकालदर्शक ही उपकरणे वापरतात. लघुकालदर्शकाच्या साहाय्याने एकसहस्त्रांश सेकंदापर्यंतचा काल मोजता येतो.