यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते; पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते.