वाक्यांचे त्यांच्या अर्थानुसार प्रकार
(1) विधानार्थी वाक्य (2) प्रश्नार्थी वाक्य (3) उद्गारार्थी वाक्य (4) होकारार्थी वाक्य (5) नकारार्थी वाक्य
1.1 विधानार्थी वाक्य | Vidhanarthi Vakya
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरण:
(1) पाखऱ्या झुंज खेळणारा बैल होता.
(2) तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही.
(3) सिद्धीविनायकाच्या दर्शनास अतोनात गर्दी होती.
(4) आपल्या आरोग्याची आपण जरुर काळजी घ्यायला हवी.
1.2 प्रशश्नार्थी वाक्य | Prashnarthi Vakya
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरण:
(1) तुझ्या यशाचे गमक काय ?
(2) तुम्ही माझ्या घरी केव्हा याल ?
(3) तुमचे उपकार मी कसे विसरेन ?
(4) आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला नको का ?
1.3 उद्गारार्थी वाक्य | Udgararthi Vakya
ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरण:
(1) अबब! केवढा मोठा साप हा!
(2) बापरे ! रस्त्यावर काय गर्दी होती !
(3) अहाहा! किती सुंदर देखावा आहे हा !
(4) अरे! इकडे कसा तू ?
(5) चूप ! एक शब्द बोल नको.
1.4 होकारार्थी वाक्य | Hokararthi Vakya
ज्या वाक्यात होकार असतो, त्यास होकारार्थी किंवा करणरुपी वाक्य म्हणतात.
उदाहरण:
(1) तो नेहमी खरे बोलतो.
(2) थोरांचा आदर करावा.
(3) गुणी व्यक्तींची प्रशंसा करा.
(4) इमारतीचा पाया भक्कम होता.
1.5 नकारार्थी वाक्य | Nakararthi Vakya
ज्या वाक्यात नकार व्यक्त केलेला असतो, त्यास नकारार्थी किंवा अकरणरूपी वाक्य म्हणतात.
उदाहरण:
(1) तो कधीच खोटे बोलत नाही.
(2) थोरांचा अनादर करु नये.
(3) गुणी व्यक्तींची निंदा करु नका.
(4) इमारतीचा पाया कमकुवत नव्हता.
प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय?
✅ Updated recently