समुद्रगुप्त सम्राटाच्या नाण्यांवर अश्वमेध, कुऱ्हाड, शिकार करताना वीणावाद्य अशा विविध मुद्रा दिसून येतात. सातवाहनांनी राजा यज्ञ सातकर्णी याने चांदी आणि तांब्याबरोबरच शिशाचीही नाणी पाडली होती. साम्राज्याने सुवर्णहोन प्रचलित केले. शिवकाळात सोन्याचा होन, चांदीची 'लारी' व तांब्याची शिवराई ही प्रमुख नाणी आढळतात.