भारतीय स्थापत्य हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. मोहेंजोदारोचे शहरी स्थापत्य हे प्राचीनकाळातील नगर रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली असली तरी, प्राचीन लेण्यांमधील कोरीव काम तत्कालीन स्थापत्यामधील बारकावे दर्शवतात.