सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला. या लढाईने ब्रिटीशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला.