प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो, प्लास्टिकचे हे प्रदूषण केवळ भूभागापुरते मर्यादित नसून ते सागरातही मोठय़ा प्रमाणावर आहे असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. दरवर्षी ८८ लाख टन प्लास्टिक जगातील महासागरांमध्ये येते व त्याचे प्रमाण अंदाजापेक्षा खूपच जास्त निघाले आहे असे सांगण्यात आले.