बहुतेक मालवाहतुकीची विमाने महाग व वजनाने हलका असलेला माल (उदा., इलेक्ट्रॉनीय उपकरण सामग्री व यंत्रभाग) वाहून नेतात. ही विमाने त्वरित पोहोचविणे आवश्यक असलेल्या नाशवंत मालाचीही (उदा., फुले, फळे व भाजीपाला) वाहतूक करतात.