फुलाचा कोणता भाग कळीच्या स्थितीत त्याचे संरक्षण करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पुष्पवृंताच्या टोकाशी असलेल्या पसरट भागाला 'पुष्पासन' म्हणतात. पुष्पासनावर फुलातील पुष्पपर्णांची एकात एक अशी रचलेली चार मंडले असतात. सर्वांत बाहेरचे मंडल हिरवट दलांचे असून त्याला 'निदलपुंज' व त्याच्या सुट्या दलांना 'निदले' म्हणतात. ते वेष्टनासारखे असून त्याद्वारे कळीचे संरक्षण होते.