प्रत्येक परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. त्या परस्परसंबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळी तयार होते. परिसंस्थेमध्ये स्वयंपोषी वनस्पतींनी तयार केलेली अन्नऊर्जा एक किंवा एकापेक्षा अधिक भक्षकांद्वारे ग्रहण केली जाते.