फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर आता व्याजदर 4.50 वरून 4.75 अंकांवर गेले आहेत. पुढच्या काळातही दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे, असे संकेतही फेडने दिले आहेत. फेडने यापूर्वीही व्याजदरात मोठी वाढ केली होती. मात्र, ही वाढ मागील वाढीच्या तुलनेत कमी आहे