मनोविश्लेषण चिकित्सा : मनोविश्लेषण ही संज्ञा फ्रॉइडप्रणीत चिकित्सापद्धतीचा निर्देश करण्यासाठीही वापरली जाते. ही पद्धती ⇨उन्मादविकृतीचा अभ्यास करताना फ्रॉइड यांनी विकसित केली. या पद्धतीचा रोख रूग्णाला स्वत:च्या अबोध मनातील आशयाचा बोधमनात प्रवेश करून घेण्यावर आणि त्यावर स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करण्यावर असतो.