बचत ही एक सवय म्हणूनही वित्तीय नियोजनासाठी उपयुक्त ठरते. याच बचतीतून व्याज मिळते. भविष्यातील गरजांचे नियोजन करता येते, काही अत्यावश्यक/आकस्मिक खर्चासाठी तरतूद करता येते आणि संपत्तीमध्ये वृद्धी होण्यासाठीही बचतीचा उपयोग होतो. बचतीचे गुंतवणुकीत रूपांतर झाल्यास आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करणे सोपे जाते.