बचत गट कशी मदत करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गटातील प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीने एकत्र येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम गटात जमा करतो/ते. हा कालावधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असतो. ही जमा केलेली रक्कम बचत गटातील सदस्यांनाच कर्ज म्हणून मिळते. कर्ज सभासदाने हप्त्या-हप्त्याने बचत गटाला परत करणे अपेक्षित असते.