त्यांच्या मते नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याच्या मार्गात निर्माण झालेले सर्व अडथळे आणि अडचणी दूर करणे. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा वापर करून त्याच्या कक्षा रुंदावणे. नकारात्मक स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही.