बालपणात आईवडिलांचे प्रेम मिळणे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. मूल प्रेमाने सांभाळणे, हिडीसफिडीस न करणे, त्याला समजून घेणे आणि समजावून सांगणे, मारझोड न करणे, शांतपणे शिकवणे, आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवायला शिकवणे, इत्यादी गोष्टी आवश्यक असतात.