बीन्समध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त आहे का?
✅ Updated recently
शरीराला ऊर्जा पुरविणार्या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेली असतात. वनस्पती व प्राणी यांमध्ये कर्बोदके विपुल प्रमाणात व विविध स्वरूपांत आढळतात. वनस्पतींच्या तंतूंत भरपूर असणारे ‘सेल्युलोज’; धान्य, मुळे व कंदमुळे यांतील ‘स्टार्च’ आणि फुलांतील मकरंद, फळे व पुष्कळ वनस्पतींच्या रसात असणारी ‘सुक्रोज’ ही कर्बोदकांची उदाहरणे होत.